School Restart : Nashik Boys Town शाळेतून आढावा, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी
आज शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी शिक्षणोत्सव साजरा केला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा अनौपचारिक स्वागत केले जाणार आहे. आज उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राचार्य हे शाळांना भेटी देणार आहेत. सोबतच पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे केलेले स्वागत, नियोजनाचे फोटो समाजमाध्यमावर पोस्ट करण्यास सांगितले आहे. #शिक्षणोत्सव या नावाने फेसबुक, इंस्टा, ट्विटर हे फोटो पोस्ट करण्यात यावेत.