NEET PG परीक्षा चार महिने पुढे,तर इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांना कोरोना रुग्णांची सेवा बजावावी लागणार
Continues below advertisement
नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा उद्रेक लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकं तज्ज्ञांसोबत बैठका घेत आहेत. सध्या कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्यसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहेत. त्यामुळे कोरोना काळात सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. कोविड व्यवस्थापनात सेवा देणाऱ्या व्यक्तींना कोविड ड्युटीचे किमान 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर आगामी सरकारी नोकर भरतीमध्ये प्राधान्य दिले जाईल, असा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे.
Continues below advertisement