NEET परीक्षा 12 सप्टेंबरला होणार, उध्या संध्याकाळपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
Continues below advertisement
मुंबई : मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट -2021' (National Eligibility Cum Entrance Test) च्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. परीक्षा यंदा 12 सप्टेंबरला होणार आहे. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांत एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सच्या पात्रतेसाठी नीट परीक्षा घेतली जाते.
देशातील कोरोनाची स्थिती पाहता परीक्षा आयोजन करण्यात येणाऱ्या शहराच्या व त्यामधील परीक्षा केंद्राच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे . नीट परीक्षा देशभरातील 198 शहरातील 3862 केंद्रावर होणार आहे. कोव्हिड चे सर्व निर्बंध पाळून परीक्षेचे आयोजन केली जाणार आहे. उद्या (13 जुलै) सायंकाळी पाच वाजल्यापासून नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होईल.
Continues below advertisement