बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी आता 'हे' विषय अनिवार्य नाही
बारावीला तुम्ही गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय शिकत नसाल आणि तुम्हाला इंजिनिअर व्हायचं असेल तर आता ते शक्य आहे. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अर्थात एआयसीटीईनं इंजिनिअरिंगसाठी नवं धोरण जाहीर केलंय. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी 12 वी परीक्षेत गणित, फिजिक्स म्हणजे भौतिकीशास्त्र, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र या विषयांचा अभ्यास केलेला नसेल तरी त्यांना इंजिनिअरिंगसाठी अर्ज करता येणार आहे. एआयसीटीईनं इंजिनिअरिंगसाठी 14 विषयांची यादी बनवली आहे. त्यातील कुठलेही 3 विषय आणि 45टक्के गुण असल्यास 12 वी पास विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगसाठी अर्ज करता येणार आहे.