Maharashtra FYJC CET 2021 उच्च न्यायालयानं रद्द केल्यानं सरकारसमोर नवा पेच, आज महत्त्वाची बैठक
Continues below advertisement
मुंबई उच्च न्यायालयाने सीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी चुरस आणखी वाढणार आहे. नामांकित आणि आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळणार आहे. कारण अंतर्गत मूल्यमापनामध्ये जाहीर झालेल्या निकालात ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले १ लाखांहून अधिक विद्यार्थी राज्यात आहेत. तर मुंबईत १५ हजारांहून अधिक विद्यार्थी आहे. शिवाय सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या अनेक विद्यार्थ्यांनासुद्धा ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत. त्यामुळे नामांकित कॉलेज मिळवण्यासाठी यावर्षी अधिक कठीण होणार आहे. दुसरीकडे कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारपुढेही पेच निर्माण झालाय. याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक होणार आहे.
Continues below advertisement