School Reopen : शिक्षण विभागाचा युटर्न; शाळा सुरु करण्याबाबतचा शिक्षण विभागाचा शासन निर्णय स्थगित
काल 8 वी ते 12 वी शाळा सुरू करण्याबबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. यामध्ये कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात ग्रामपंचायतीच्या परवानगीनंतर शाळा सुरू करण्यात याव्यात अस यामध्ये नमूद करण्यात आला होतं. मात्र हा शासन निर्णय स्थगित करण्यात आला असून स्थानिक प्रशासन, शाळांचे मुख्यध्यापक, पालक यांच्याकडून माहिती घेऊन स्थानीक पातळीवरील अहवाल सादर झाल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आहे. त्यामुळे याबाबत नव्याने शासन निर्णय जाहीर होईल. काही तांत्रिक बाबीमुळे हा शासन निर्णय स्थगित करण्यात आल्याचं सांगण्यात आलाय. विशेष म्हणजे शासन निर्णय स्थगित झाल्याबाबत अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना देण्यात आल्या नाहीत