Maharashtra Board Exam Dates 2021 | SSC & HSCची परीक्षा ऑफलाईनच : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड UNCUT
मुंबई : बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार असल्याची महत्वाची बातमी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी दिली आहे. या काळात परीक्षा या सकाळी 11 ऐवजी साडे 10 वाजता सुरू होणार असल्याचंही स्पष्ट झालंय.
ऑनलाइन परीक्षा घेण्याबाबत खूप विचार केला गेला पण दुर्गम भागात ऑनलाइन परीक्षा घेणे कठीण आहे असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी स्पष्ट केलं. 80 मार्कच्या पेपरसाठी साडे तीन तास वेळ मिळणार आहे, म्हणजे पेपर सकाळी साडे 10 वाजता सुरू होणार असून ती दुपारी 2 वाजेपर्यत असेल. राज्यात दहावीसाठी सुमारे 17 लाख विद्यार्थी तर बारावीसाठी सुमारे 13 लाख विद्यार्थी बसले आहेत.
एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन , कन्टेनमेंट झोन , संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन जुन महिन्यामध्ये करण्यात येईल . सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील .
परीक्षा मंडळामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्ट मध्ये घेण्यात येईल . सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.