UPSC Results : कोल्हापूरच्या आनंदा पाटील याचा UPSC मध्ये डंका! अल्पदृष्टी असूनही संकटावर केली मात

कोल्हापूर: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC Recult)निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात महाराष्ट्रीत 100 जणांनी घवघवीत यश मिळवलं आहे. यामध्ये कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यूपीएससी परीक्षेत गारगोटी येथील आनंदा अशोकराव पाटील हा देशात 325 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदा हा अल्प दृष्टी आहे. त्यामुळे हे यश संपादन करताना इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत खूप परिश्रम घ्यावे लागले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola