Ukraine : युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांना धक्का,विद्यापीठात समायोजित करण्यास केंद्राची असमर्थता
Continues below advertisement
रशियानं युद्ध पुकारल्यामुळे जवळपास 20 हजार भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन सोडून मायदेशी परतावं लागलं.. मात्र या विद्यार्थ्यांना भारतीय विद्यापीठ किंवा संस्थांमध्ये समायोजित करता येऊ शकणार नाही असं शपथपत्र केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात काल दाखल केलंय. ((हे सर्व विद्यार्थी ‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाले अथवा भारतात शुल्क भरू न शकल्याने परदेशात शिक्षणासाठी गेले होते. त्यामुळे त्यांना सवलत दिल्यास देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या निकषांची पायमल्ली होईल. त्यामुळे देशभरात कोर्टकज्जे वाढू शकतात. त्याचप्रमाणे हे विद्यार्थी शुल्कही भरू शकणार नाहीत, अशा शब्दांत केंद्राने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे युक्रेनमधून मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे.
Continues below advertisement