Rules For Maharashtra School : शाळेसाठी मार्गदर्शक सूचना, काय आहे राज्य सरकारची नियमावली?

Continues below advertisement

मुंबई : आज (सोमवार 4 ऑक्टोबर) राज्यातील शाळा सुरू होणार आहे. या निमित्ताने दुपारी 12 नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांना सुद्धा हा कार्यक्रम दखविण्यात यावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

शिक्षणोत्सव साजरा केला जाणार : 
आज शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी शिक्षणोत्सव साजरा केला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा अनौपचारिक स्वागत केले जाणार आहे. आज उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राचार्य हे शाळांना भेटी देणार आहेत. सोबतच पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे केलेले स्वागत, नियोजनाचे फोटो समाजमाध्यमावर पोस्ट करण्यास सांगितले आहे. #शिक्षणोत्सव या नावाने फेसबुक, इंस्टा, ट्विटर हे फोटो पोस्ट करण्यात यावेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram