Gadchiroli : अतिसंवेदनशील भागात विद्यार्थ्यांना शिक्षण, खुर्शीद शेख यांना राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षल संवेदनशील भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या खुर्शीद शेख यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षणाची गोडी नसलेल्या सीमावर्ती क्षेत्रातील माडिया भाषिक शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कसब खुर्शीद शेख यांनी साधले आहे. आव्हानात्मक ठिकाणी केलेल्या कार्याची दखल घेतल्याने आपला हुरूप वाढला असल्याचे सांगत त्यांनी हा पुरस्कार जिल्हावासियांना समर्पित केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola