NAAC Grade Scam : 'नॅक'मध्ये पैसे घेऊन मूल्यांकन देणारी साखळी, माजी नॅक प्रमुखांचा खळबळजनक आरोप

Continues below advertisement

NAAC Grade Scam : 'नॅक'मध्ये पैसे घेऊन मूल्यांकन देणारी साखळी, माजी नॅक प्रमुखांचा खळबळजनक आरोप

आपल्या मुलांना कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायचं झालं. की पालक सर्वात आधी त्या कॉलेजला किती ग्रेड आहे हे तपासतात. पण कॉलेजला मिळणारी ही ग्रेड. ही फसवी असल्याचा खळबळजनक आरोप. ही ग्रेड देण्याची जबाबदारी असलेल्या नॅक या संस्थेचे माजी प्रमुख, भूषण पटवर्धन यांनी एबीपी माझावर केला आहे.
पटवर्धन यांच्या मते. नॅक या यंत्रणेमध्ये पैसे घेऊन, ग्रेड देणारी यंत्रणा कार्यरत  आहे. याच सगळ्या गैरकारभारावर आपण बोट ठेवले. पण त्याची दखल न घेतल्यानेच, आपण या संस्थेच्या पणुखपदाचा राजीनामा दिल्याची माहितीही त्यांनी दिली. नॅकसारख्या संस्थेमध्ये, महाविद्यालयांच्या मूल्यांकनामध्ये जर गैरव्यवहार होत असेल, तर ही विद्यार्थ्यांची आणि पालकांची शुद्ध फसवणूक असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. इतकंच नाही. तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धोरणावरही पटवर्धनांनी आक्षेप घेतला. परकीय विद्यापीठांना रेड कार्पेट आणि स्थानिक विद्यापीठांना दूजाभाव मिळत असल्याचा आरोपही, पटवर्धन यांनी केला. ही सविस्तर मुलाखत आपण आज रात्री साडे नऊ वाजता पाहणार आहोत. पण तूर्तास. पटवर्धन यांनी केलेला आरोप पाहुयात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram