Pune : अनेक महाविद्यालयात विज्ञान शाखेपेक्षा कला शाखेची कट ऑफ जास्त, काही विद्यालयात Cut Off 97 पार
Continues below advertisement
Pune FYJC Admission: यावेळी अकरावीला प्रवेश घेताना सायन्स पेक्षा आर्ट्सला अॅडमिशन घेण्याकडे हुशार विद्यार्थ्यांचा कल दिसून येतोय. त्यामुळं पुण्यातील फर्ग्युसन , मॉडर्न , वाडिया , गरवारे या आघाडीच्या महाविद्यालयांमध्ये Science पेक्षा यावेळी Arts साठीची कट ऑफ लिस्ट वरचढ ठरलीय. करियरबद्दल आजचे तरुण नक्की काय विचार करतायत हे यातून दिसून येतंय . शिक्षण क्षेत्रातील हे बदल एका अर्थानं आपल्या देशातील बदलेली आर्थिक परिस्थिती आणि नोकऱ्यांच्या संधींमध्ये झालेले बदल दर्शवतात. ज्यांना नव्वद टक्क्यांहून अधिक गुण आहेत असे विद्यार्थी सायन्स ऐवजी आर्टसची निवड करतायत. काही महाविद्यलयांमध्ये तर आर्टसची कट ऑफ लिस्ट 97 टक्क्यांच्याही पुढं पोहोचली आहे. पुण्यातील सर्वच प्रमुख महाविद्यालयांमध्ये हा ट्रेंड दिसून येतोय.
Continues below advertisement