Maharashtra Unlock : राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा तर 7 पासून मंदिरं उघडणार, नाट्यगृहसुद्धा अनलॉक!
Continues below advertisement
Maharashtra Unlock : राज्यात कोरोनाची संख्या कमी होत असल्याचं दिसताच आता राज्य सरकारकडून (Maharashtra Govt)अनलॉकची प्रक्रिया सुरु केली जात आहे. राज्य सरकारकडून आता शाळा, मंदिरं आणि नाट्यगृहं सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे, असं ट्वीट मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने करण्यात आलं आहे.
Continues below advertisement