15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान CET परीक्षा , 2 नोव्हेंबरपासून राज्यातील कॉलेज सुरू करण्याचा विचार
येत्या 2 नोव्हेंबरपासून कॉलेज सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे अशी माहिती तंत्र व शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. महाविद्यालये सुरू करण्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना आज महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. दोन लशीचे डोस झालेल्या विद्यार्थांसाठी महाविद्यालयं सुरू करता येतील असे सामंत यांनी बोलताना सांगितले शिवाय महाविद्यालयीन फी कपात करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.