CBSE Plan : दहावीला तीन तर बारावीला दोन भाषा अनिवार्य, सीबीएसईचा प्रस्ताव

माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर मोठे बदल करत दहावीपर्यंत दोनऐवजी तीन भाषांचा अभ्यास करणं अनिवार्य करण्याचा प्रस्ताव सीबीएसईकडून सादर करण्यात आलाय. त्यापैकी किमान दोन भाषा भारतीय असणे आवश्यक आहे. तर अकरावी-बारावीच्या स्तरवर एकाऐवजी दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार असल्याचंही सीबीएसईकडून सांगण्यात आलंय. त्यापैकी किमान एक मूळ भारतीय भाषा असली पाहिजे, असंही प्रस्तावात नमूद करण्यात आलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola