CBSE कडून दहावी बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर,नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पहिल्या सत्राची परीक्षा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCBSE Date Sheet 2022 : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (CBSE) दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्यांदाच बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात येणार आहे. कोरोना संकटामुळे मागच्या वेळेप्रमाणे बोर्ड परीक्षा रद्द होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही डेटशीट cbse.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
CBSE ची दहावी बारावीची पहिली टर्म परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात येणार आहे. तर दुसरी टर्म परीक्षा मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणार आहे. पहिल्या टर्ममधील परीक्षेत विद्यार्थ्यांना फक्त ऑब्जेक्टिव प्रश्न विचारण्यात येणार आहे. तर दुसरी टर्म परीक्षा मार्च- एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणार असून या परीक्षेत ऑब्जेक्टिव आणि सब्जेक्टिव असे दोन प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार आहे.