Board Exams : बोर्ड परीक्षांसंदर्भात शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय, परीक्षा वर्षातून दोनदा होणार
बोर्ड परीक्षांसंदर्भात शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतलाय.. दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येत असून विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा देता येईल. या दोन्ही परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे... त्याशिवाय, राष्ट्रीय अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. या दोन्ही भाषांपैकी एक भाषा ही भारतीय भाषा असणे अनिवार्य असणार आहे.
Tags :
Board Exam Decision Announced Ministry Of Education National Education Policy Union Ministry Of Education Board Big Decision Major Changes Upcoming Academic Year Syllabus Design Best Marks