Bhausaheb Chaskar on School : शाळांबाबत जिल्हापातळीवर न देता तालुका पातळीवर निर्णय घेणं जास्त सुकर
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. पण सोमवारपासून नव्हे तर 24 जानेवारीपासून मुंबईतील शाळा सुरू होणार आहेत. तर पुणे आणि औरंगाबादमधील शाळा या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असं स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केलंय.