21 मार्चला MPSCची परीक्षा असल्याने एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या परीक्षेला विद्यार्थी मुकणार
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 14 मार्च रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगानं जाहीर केलाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचं सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असं आयोगानं कळवलं आहे.