Yavatmal: एकाच कुटुंबातल्या तीन बालकांवर तीन हल्ले ABP Majha
वणी : शहरातील मोमीनपुरा येथे आज एका 5 वर्षीय चिमुकल्यावर अॅसिड सदृश्य द्रव्य टाकून हल्ला करण्यात आला. आज सायंकाळी दरम्यान ही घटना आहे. अशा द्रव्य हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. विशेष म्हणजे शनिवारी ,रविवारी आणि आज पुन्हा त्याच प्रकारे द्रव्य टाकून हल्ला करण्यात आला तिन्ही चिमुकले वणी येथील शफीउल्ला खान नामक व्यक्तीच्या कुटुंबातील बालक आहेत शनिवार 8 वर्षीय बालक आणि रविवारी 6 वर्षीय बालिकावर असाच प्रकारे द्रव्य टाकण्यात आले होते सदर द्रव्य हे बॅटरी वॉटर असल्याचे समोर आले होते.