मनसुख हिरण हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा मास्टरमाईंड, NIA सूत्रांची माहिती, कोण आहे प्रदीप शर्मा?
मुंबई : नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेले एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना आज एनआयएने (NIA) अटक केली आहे. मनसुख हिरण हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करणे आणि या कटात सहभागी असल्याचा आरोप लावत त्यांना आज एनआयएने अटक केली आहे. त्याच बरोबर अजून दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून आता या प्रकरणात एकूण 10 लोकांना अटक करण्यात आली आहे.