पिंपरी-चिंचवडमधील दहशत थांबणार कधी? पोलीस आयुक्तांपेक्षा गुंड डॅशिंग झालेत का? स्पेशल रिपोर्ट

पिंपरी-चिंचवड : आयर्नमॅन म्हणून ओळखले जाणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड शहराची सूत्र हाती घेतली आणि पहिल्याच दिवशी गुन्हेगारांना तंबी दिली. पण गुन्हेगारांनी या तंबीला फारसं गांभीर्याने घेतलं नसल्याचं शुक्रवारच्या घटनेने स्पष्ट झालंय. उलट शहर बिहारच्या दिशेने पावलं टाकत असल्याचंच दृश्य समोर आलंय. शंभर जणांच्या टोळक्याने घातलेला धुडकूस सीसीटीव्हीत कैद झाला आणि कायदा सुव्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजलेत हे चव्हाट्यावर आणलं. घडल्या प्रकाराने परिसरात चांगलीच दहशत पसरलेली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांचा धाक राहिला नसल्याचीच चर्चा सर्वत्र रंगलीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola