इको कारमध्ये दोघांचा एन्काऊंटर करण्याचा डाव होता- सूत्र, स्फोटकं प्रकरणाचं गूढ लवकरच उलगडणार

मुंबईतील अँटिलियाजवळ स्कॉर्पिओमधील स्फोटकांची चौकशी करताना मिठी नदीत एनआयएला नंबर प्लेट सापडली होती, ती कार औरंगाबादची आहे. एनआयएच्या पथकाला मिठी नदीत कारची नंबर प्लेट सापडली तिचा नंबर  MH 20 FP 1539 असल्याचे आढळले. नंबर प्लेट विजय मधुकर नाडे यांच्या मारुती इको कार, छत्रपती नगर, हडको NH 12, औरंगाबादची होती. विजय नाडे हे जालना येथील समाज कल्याण विभागात लिपीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ही इको कार 16 नोव्हेंबर 2020 रोजी उद्धवराव पाटील चौकातून चोरी झाली. याबाबत सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारची चौकशी केली नाही असा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola