Panvel Crime :पॅरोलवर सुटलेल्या संजय कार्ले यांना गोळ्या झाडून संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
Panvel Crime : मुंबई गोवा महामार्गावर एका फार्म हाऊसच्या बाहेर उभ्या असलेल्या एका आलिशान गाडीत एक मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे... हा मृतदेह पॅरोलवर सुटलेल्या संजय कार्ले नावाच्या व्यक्तीचा असल्याची माहिती आहे.. गोळ्या झाडून या व्यक्तीची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येतेय. संजय हा मूळचा पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आहे. सोन्याची बनावट नाणी विकून तो अनेकांची फसवणूक करायचा. त्यावर अनेक गुन्हे दाखल झाल्यानं त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. तो पोलिसांच्या अटकेत ही होता, सहा महिन्यांपूर्वीच तो पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर त्याच्या हत्येचीच बातमी समोर आलीय