प्रियकराच्या हत्येचा डाव,अनैतिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रियकराच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला
माटुंगा पोलिसांनी एका नामांकित बँकेच्या असिस्टंट मॅनेजरला आपल्या प्रियकराची सुपारी देताना अटक केली आहे. अटक केलेल्या महिलेचा प्रियकर मुंबई महानगरपालिकेच्या एका वॉर्ड ऑफिसमध्ये सब इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी जर ही अटक केली नसती तर सब इंजिनीयरची आत्तापर्यंत हत्या झाली असती. विशेष म्हणजे तिघेही उच्चशिक्षित आहेत. आरोपी महिला मुंबईच्या नामवंत बँकेमध्ये गेल्या चार वर्षापासून असिस्टंट मॅनेजर आहे. ज्याला सुपारी दिली तो केमिस्ट्रीमध्ये बीएससी आहे तर ज्याला मारणार होते तो मुंबई महानगरपालिकेमध्ये सब इंजिनियर आहे.