Thane : गरोदर पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पत्नीला जाळणारा नराधम पती गजाआड : ABP Majha
रागाच्या भरात गरोदर पत्नीला जाळून मारून टाकण्याचा प्रयत्न कळव्यात राहणाऱ्या एका नराधमानं केलाय. अनिल बहादूर चौरसिया असं पत्नीला जाळणाऱ्याचं नाव आहे. यात त्याच्या पत्नीच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्या महिलेवर देखील उपचार सुरू आहेत. मफतलाल कंपनी भागातील लोकवस्तीमध्ये महिला तिच्या दोन मुली आणि पतीसोबत राहत होती. गेल्या सहा महिन्यांपासून महिला गरोदर होती. तिच्या पतीने दुसरा विवाह केल्याने दोघांमध्ये सतत वाद होत असत. शनिवारी सायंकाळी घरामध्ये असताना महिला आणि तिच्या पतीमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून पतीने तिच्या अंगावर राॅकेल ओतून तिला जाळले.