Used Handgloves selling | औरंगाबाद आणि भिवंडीमध्ये मध्ये वापरलेल्या हॅन्डग्लोव्हजचा मोठा साठा जप्त

औरंगाबाद : नवी मुंबई क्राईम ब्रांचतर्फे वैद्यकीय हॅन्डग्लोजचे पुनर्वापर करुन त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. हे सगळे वापरलेले हॅन्डग्लोज औरंगाबादच्या वाळूज भागातील एका गोडाउनमध्ये वापरण्यायोग्य केले जात होते. औरंगाबाद आणि नवी मुंबई पोलिसांनी या गोडाऊन मधून मोठा साठा जप्त केलाय.

औरंगाबाद जवळील वाळूज एमआयडीसी भागात एका गोडाउनमध्ये वापरलेल्या हॅन्डग्लोजचा मोठा साठा औरंगाबाद आणि नवी मुंबई पोलिसांनी जप्त केलाय. एकीकडे कोरोनाच्या महामारीच संकट आहे, कोरोना महामारीचा सामना सगळं जग करत आहे. मात्र, दुसरीकडे काही नराधम नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola