Santosh Deshmukh Case Update :Sudarshan Ghule सह तीन आरोपींची हत्येची कबुली Walmik Karadचा पाय खोलात

संतोष देशमुख हत्या प्रकरणातली आतापर्यंतची सर्वात मोठी आणि एक्स्लुझिव्ह बातमी...

हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड सुदर्शन घुलेसह तीन आरोपींना कबुली दिल्याची माहिती आहे. सुदर्शन घुलेने या प्रकरणात हत्येची कबुली दिली आहे अशी माहिती सूत्रांकडून समजतेय. त्याच्यासह जयराम चाटे, महेश केदार यांनीही गुन्ह्याची कबुली दिली अशी माहिती आहे. एबीपी माझाच्या हाती ही एक्स्लुझिव्ह माहिती हाती लागलीय. या कबुलीमुुळे मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात अडकलाय. आधी गुन्हा केला नाही असा दावा करणाऱ्या घुलेला आवादा कंपनीतला धमकीचा व्हिडीओ दाखवल्यावर तो बोलायला लागला. होय आम्हीच अपहरण केलं, आम्हीच खून केला अशी कबुली घुलेने दिली... खंडणी प्रकरणात देशमुख हे अडथळा होत होते असं त्याने म्हटलंय. आवादा कंपनी परिसरात देशमुख आणि ग्रामस्थांनी मारहाण केली. प्रतिक घुलेचा वाढदिवस असतानाच आम्हाला मारहाण केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याचा राग मनात होता म्हणून हत्या केल्याचं घुलेने कबुल केलंय अशी एक्स्लुझिव्ह माहिती आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola