सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून सुविधा केंद्रात बदली, हिरण मृत्यूप्रकरणी वाझेंवर गंभीर आरोप

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची मुंबई क्राईम ब्रांचमधून बदली करण्यात आली आहे. या संदर्भात शरद पवार संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं समजतंय. गृहमंत्र्यांच्या घोषणेनंतरही विरोधकांचं समाधान झालेलं नाही. वाझेंचं निलंबन करुन त्यांना अटक करावी या मागणीवर भाजप आक्रमक आहे. कालच विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेंवर गंभीर आरोप केले होते. वाझेंनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा संशय विमला हिरण यांना असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola