Sachin Vaze | 'सचिन वाझे आणि मनसुख हिरण मर्सिडीजमध्ये भेटले!' मनसुख हिरण हत्या प्रकरणात नवा उलगडा
दीपेश त्रिपाठी, एबीपी माझा
Updated at:
19 Mar 2021 03:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कार्पिओ आढळल्यानंतर या प्रकरणाचा समांतर तपास NIA आणि ATS करत होती. त्यावेळी सचिन वाझे हे मृत मनसुख हिरणच्या सातत्याने संपर्कात असल्याची माहिती त्यांच्या सीडीआरमधून उघडकीस आली आहे.
हा तपास सीआययूकडे असताना या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेने चालला आहे तसेच यामध्ये नेमकी काय चौकशी केली जात आहे याची सारी डिटेल्स सचिन वाझे घेत असल्याचं त्यांच्या सीडीआरमधून स्पष्ट झालं आहे.