अॅंटिलियाबाहेरील गाडी वाझेंच्या सोसायटीमध्ये उभी होती? वाझेंकडून आपल्याच सोसायटीचे CCTV फुटेज नष्ट?

मुंबई : एनआयएच्या कोठडीत असलेल्या सचिन वाझे  यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सचिन वाझे यांचं घर असलेल्या ठाण्यातील साकेत सोसाटीमधील दोन डीव्हीआर ( डिजीटल व्हिडीओ रेकॉर्डर) मनसुख यांचा मृतदेह सापडण्यापूर्वीच जप्त करण्यात आले होते. मनसुख हिरण यांचा मृतदेह 5 मार्च रोजी मुंब्रा खाडीत आढळून आला. मात्र साकेत सोसायटीमधले डीव्हीआर 27 फेब्रुवारीला ताब्यात घेण्यात आले होतं. धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणात सचिन वाझे यांनी जप्त केलेले पुरावे रेकॉर्डवर नसल्याचं कळतंय. या संपूर्ण प्रकरणात साकेत सोसायटीमधील तीन पत्र पत्रव्यवहार एबीपी माझ्याच्या हाती आले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola