Pune : तुमच्या मुलांना नापास शिक्षक शिकवतात? घोटाळेबाजांनी पैसे देऊन 7800 परीक्षार्थी केले उत्तीर्ण

Continues below advertisement

टीईटी घोटाळ्यासंदर्भात पुणे सायबर पोलिसांच्या सुरू असलेल्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आलेय. २०१९-२० या वर्षी झालेल्या टीईटी परीक्षेत तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थी पैसे देऊन पास झाले असल्याचं वास्तव उघड झालंय. या प्रकरणाचा तपास करत असताना सायबर पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी केली. त्यात फक्त २०१९-२० च्या परीक्षेत पात्र ठरलेल्या १६ हजार ५९२ परीक्षार्थींपैकी तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थी अपात्र होते हे निष्पन्न झालंय. २०१८ सालच्या परीक्षेतही असा प्रकार झाला असून त्याचीही पडताळणी सूरू आहे. घोटाळेबाजांची ही फसवणूा २०१२ पासून सुरू होती असं पोलीसांचं म्हणणं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram