Pune Crime News : हृदयात ब्लॉकेजसाठी पत्नी जबाबदार, अजब कांगाव्यानंतर सासरच्या मंडळीवर गुन्हा
Pune Crime News : हृदयात ब्लॉकेजसाठी पत्नी जबाबदार, अजब कांगाव्यानंतर सासरच्या मंडळीवर गुन्हा
जगभरात महिला दिन उत्साहात साजरा होत असतानाच, पुण्यातील धनकवडी इथं धक्कादायक प्रकार घडलाय. पत्नी घरात आल्यापासून आपल्या हृदयात ब्लॉकेज निर्माण झाले, असं म्हणत पतीने पत्नीचा छळ केल्याची तक्रार पत्नीने केलीय. त्यानुसार पोलिसांनी पतीसह त्याच्या कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल केलाय. तक्रारदार महिलेचं २०२१ मध्ये लग्न झालं, मात्र त्यानंतर काही महिन्यांतच पती आणि सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू करण्यात आला. लग्न झाल्यानंतर पत्नी घरात आली, त्यामुळे आपल्या हृदयात ब्लॉकेज निर्माण झाले, असा कांगावा करत पतीने छळ केल्याचं फिर्यादी महिलेचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर, जाड असल्यावरूनही वारंवार हिणवलं गेल्याची तक्रार महिलेनं केलीय. महिला दिनाच्या निमित्ताने जगभरात नारीशक्तीचा जागर मांडला जात असताना, पुण्यातून ही दुर्दैवी घटना समोर आलीय.