Nashik Rave Party Busted : नाशिकच्या इगतपुरीमधील हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांची धडक, 22 अटकेत

नाशिक : नाशिकच्या इगतपुरीमध्ये सुरु असलेल्या एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत एकूण 22 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात साऊथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील काहींचा समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे घटना स्थळावरून पोलिसांनी ड्रग्स आणि इतर साहित्यही ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातही ड्रग्सचे मुंबई कनेक्शन समोर आले असून इगतपुरी हा रेव्ह पार्टीचा अड्डा बनलाय का? असाही प्रश्न आता उपस्थित होतोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola