#ArnabGoswami अर्णब गोस्वामी यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला,हायकोर्टकडून तातडीने कुठलाही दिलासा नाही
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना आजही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जवरील सुनावणी आता उद्या दुपारी पार पडणार आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना आजची रात्रही तुरुंगातच काढावी लागणार आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आज बराच युक्तीवाद झाल्यानंतर उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी उद्या दुपारी 12 वाजता घेणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना तिसरी रात्र तुरुंगात काढावी लागणार आहे.