Pune : लोकसेवक Nitin Dhage यांना लाच घेताना रंगेहाथ अटक, मध्यरात्री सापळा रचून ACB ची कारवाई
पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल रात्री मोठी कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेले जातपडताळणी विभागातील उपायुक्त नितीन ढगे यांची आतापर्यंत 2 कोटी 81 लाखांची बेनामी मालमत्ता आढळलीय. यांत 1 कोटी 28 लाखांची रोकड, दोन फ्लॅट आणि एका दुकानाचा समावेश आहे. एसीबीने ढगे यांना एक लाख 90 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक केलीय.