Bhopal Crime : भोपाळच्या Nishank Rathod मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट, चायनीय ॲपवरुन कर्ज घेतल्याचं उघड

भोपाळमधील विद्यार्थी निशांक राठोडच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी नवी माहिती समोर आलीय. निशांकनं अनेक चायनीज अॅपवरुन कर्ज घेतलं होतं. या कर्जाच्या परतफेडीसाठी निशांकवर दबाव वाढत होता. त्यामुळे तो तणावात होता अशी माहिती समोर आलीय. निशांकने त्याच्या मित्रांकडूनही पैसे घेतले होते. त्याने हे पैसे मौजमजा करण्यासाठी उडवले होते. याच पार्श्वभूमीवर पोलीस निशांकच्या मित्रांची चौकशी करतायत.. निशांकच्या मृत्यूच्या आधी त्याच्या वडिलांना संशयास्पद मेसेज आला होता. मेसेजमध्ये 'गुस्ताख-ए-नबी की इक ही सजा, सर तन से जुदा' असे लिहिले होते. हा मेसेज कुणी पाठवला याचाही पोलीस तपास करतायत..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola