महाराष्ट्र ATS ने मुंबईतून जप्त केले 7 किलो युरेनियम,प्रकरणाचा तपास एटीएसकडून आता एनआयएकडे वर्ग

मुंबई : महाराष्ट्र एटीएसनं 7 किलो युरेनियमसारख्या घातक पदार्थासोबत दोन तरुणांना अटक केली आहे. एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी सांगितलं की, हे दोन्ही आरोपी युरेनियम विकण्याच्या प्रयत्नात होते आणि त्यासाठी ग्राहक शोधत होते. 7 किलो युरेनियमसह अटक करण्यात आलेल्या या दोन आरोपींची नाव आहेत, जिगर पंड्या आणि अबु ताहिर अफसल हुसैन चौधरी. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिगर पांड्या आणि अबू ताहिर दोघेही कॉलेजमध्ये असल्यापासून एकमेकांना ओळखतात. ताहिर इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं काम पाहतो. दोन्ही आरोपींनी एमबीएमचं शिक्षण पूर्ण केलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola