NIA कोर्टात Sachin Waze यांच्या याचनेनंतर कोर्टाकडून वाझेंना खाजगी रुग्णालयात उपचाराची परवानगी

Continues below advertisement

मुंबई : अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरणातील आरोपी सचिन वाझेनी पुन्हा कस्टडी मागणारा अर्ज विशेष एनआयए कोर्टानं सोमवारी फेटाळून लावला. याप्रकरणांत झालेल्या अटकेनंतर सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या बडतर्फ सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेसह पोलीस निरिक्षक सुनील मानेची पुढील चौकशी करण्यासाठी पुन्हा कस्टडी देण्याची मागणी करत या प्रकरणाचा तपास करणा-या एनआयएनं कोर्टात अर्ज केला होता. मात्र मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाचे न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी हा अर्ज फेटाळून लावला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram