Narayan Rane Arrested: नारायण राणेंच्या अटकेची थेट कारवाई बेकायदेशीर,राणेंच्या वकिलांची प्रतिक्रिया

कोकणात राजकीय घडामोडींना वेग आला असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नारायण राणेंना ताब्यात घेतल्यानंतर आता कोर्टामध्ये कसं हजर करायचं याचीही कायदेशीर माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. संगमेश्वरमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पेलिसांनी अटक केले आहे. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. 


नारायण राणेंना अटक करण्यापूर्वी रत्नागिरी पोलीस अधिक्षकांनी सुमारे तासभर नारायण राणेशी चर्चा केली. त्यावेळी नितेश राणे, प्रसाद लाड आणि इतर भाजप नेते या ठिकाणी उपस्थित होते. 

दरम्यान, राणेंच्या अटकेनंतर माझाने राणेंच्या वकिलांशी संवास साधला असता ही अटकेची थेट कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत आम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी दाद मागू असे वकिल अनिकेत निकम यांच्याकडून सांगण्यात आले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola