Nagpur Crime : राज्याची उपराजधानी पुन्हा हादरली; वृद्ध महिलेची धारदार शस्त्रानं गळा चिरुन हत्या

Continues below advertisement

Nagpur Crime News : राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेनं हादरलंय. नागपूरात 78 वर्षीय वृद्धेची घरात गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. देवकी बोबडे असं हत्या झालेल्या वृद्धेचे नाव आहे. नागपुरातील टीबी रुग्णालयाच्या सेवानिवृत्त डॉक्टर होत्या. धक्कादायक म्हणजे, मारेकऱ्यांनी घरात घुसून वृद्ध देवकी बोबडे यांचे दोन्ही हात खुर्चीला बांधून आणि तोंडाला पट्टी बांधून धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून हत्या केली. नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या घटनेमुळं पुन्हा एकदा उपराजधानी दहशतीखाली गेली आहे. 

राज्याची उपराजधानी पुन्हा एकदा हत्येच्या घटनेनं हादरली आहे. गॅंगवार आणि गुन्हेगारांच्या हत्येच्या घटना पाहणाऱ्या नागपुरात यंदा एका 78 वर्षीय वृद्धेची घरात गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. देवकी बोबडे असं हत्या झालेल्या वृद्धेचं नाव असून त्या सेवानिवृत्त डॉक्टर आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मारेकऱ्यांनी घरात घुसून वृद्धेचे दोन्ही हात खुर्चीला बांधून तोंडाला पट्टी बांधून धारदार शस्त्रानं त्यांचा गळा चिरून हत्या केली. दोनच दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्येनं नागपूर हादरलं होतं. हे हत्येचं प्रकरण शांत झालेलं नसताना आता या वृद्ध महिलेच्या हत्येनं पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.  

नागपुरातील गायत्री कॉन्व्हेंटजवळ देवकी बोबडे राहत होत्या. त्याच घराच्या वरच्या माळ्यावर त्यांची मुलगी आणि जावईही राहतात. ते दोघेही डॉक्टर असल्यानं काल सकाळी दोघेही कामावर गेले होते. संध्याकाळी घरी आल्यानंतर मुलीने आईच्या घराचे दार उघडल्यावर देवकी बोबडे रक्ताच्या थारोळ्यात आढळल्या. त्यांची तपासणी केली असता त्या मृत होत्या आणि त्यांची गळा चिरून हत्या केल्याचं उघडकीस आलं होतं. धक्कादायक म्हणजे, मारेकऱ्यांनी घरात घुसून वृद्ध देवकी बोबडे यांचे दोन्ही हात खुर्चीला बांधून आणि तोंडाला पट्टी बांधून धारदार शस्त्रानं त्यांचा गळा चिरून हत्या केली. नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र आतापर्यंत ही हत्या कोणी आणि का केली? याचा उलगडा होऊ शकलेला नाही.

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram