Mumbai Cruise Drugs Case : आर्यन खानसोबत मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंटही अटकेत ABP Majha

Continues below advertisement

मुंबई : मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीच्या छाप्यानंतर ताब्यात घेतलेल्या आठपैकी तीन जणांना एजन्सीने अटक केली आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही अटक करण्यात आली आहे. एनसीबीने या तीन आरोपींना जेजे रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेले आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती एनसीबीच्या सुत्रांनी दिली आहे. 

आरोपींना सायंकाळी 7 वाजता न्यायालयात हजर केले जाईल. मुंबईच्या फोर्ट कोर्टात हजर केले जाणार आहे. तीन शक्यता सांगितल्या जात आहे. यात आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर केले जाऊ शकते. किंवा त्यांना न्यायालयात नेले जाऊ शकते जेथे न्यायाधीश विशेषतः या प्रकरणात सुनावणीसाठी येतील. किंवा मग ते दंडाधिकाऱ्यांच्या बंगल्यावरही नेऊ शकतात.

एनसीबीने शनिवारी रात्री क्रूझवर छापा टाकला आणि तेथून आठ जणांना ताब्यात घेतले. सर्व लोकांची सुमारे 16 तास सखोल चौकशी करण्यात आली आणि त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या चौकशीदरम्यान, एनसीबीला माहिती मिळाली की त्यांना ज्याने ड्रग्ज दिले तो बेलापूर, नवी मुंबई येथे राहत होता.

गुप्त माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी संध्याकाळी गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकला आणि पार्टी करणाऱ्या काही प्रवाशांकडून ड्रग्ज जप्त केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram