Mumbai Cruise Drug Case : Aryan Khanसह इतर आरोपींची 11ऑक्टोबरपर्यंत एनसीबीने कोठडी मागितली ABP Majha

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळणार की पुन्हा कोठडी याचा फैसला आज न्यायालयात होणार आहे. अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एनसीबीनं आर्यन खानला शनिवारी गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर अटक केली होती. त्यानंतर आर्यन खान एनसीबीच्या कोठडीत आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांची एनसीबी कोठडी आज संपत आहे. त्यामुळे या तिघांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. यावेळी एनसीबी पुन्हा आर्यनची कोठडी मागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणी एनसीबीनं एका परदेशी नागरिकाला काल रात्री अटक केलीय.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola