Mumbai Cruise Drug Case : ड्रग्ज पार्टी प्रकरणात Aryan Khanला 7ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी

Continues below advertisement

Mumbai Drugs Case Update : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मोठा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) कालची रात्र आयुष्यात कधीच विसरु शकणार नाही. मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक केलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना 7 ऑक्टोबरपर्यंत  NCB कोठडी सुनावण्यात आली. मुंबई किनाऱ्यावरील एका क्रूझवर एका पार्टीमध्ये केलेल्या छाप्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. 

एनसीबीने शनिवारी रात्री क्रूझवर छापा टाकला आणि तेथून आठ जणांना ताब्यात घेतले. सर्व लोकांची सुमारे 16 तास सखोल चौकशी करण्यात आली आणि त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या चौकशीदरम्यान, एनसीबीला माहिती मिळाली की त्यांना ज्याने ड्रग्ज दिले तो बेलापूर, नवी मुंबई येथे राहत होता. गुप्त माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी संध्याकाळी गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकला आणि पार्टी करणाऱ्या काही प्रवाशांकडून ड्रग्ज जप्त केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram