Mumbai Crime : टीचर, सेक्स, धोखा.. शिक्षिकेला प्रेमात अडकवलं, पण नवऱ्यासोबत जाते म्हटल्यावर....

Continues below advertisement

Mumbai Crime News : शिक्षक हा विद्यार्थ्याचा मार्गदर्शक असतो. मात्र मुंबईमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईमधील आरे पोलिसांनी एक अशा विद्यार्थ्याला अटक केली आहे. ज्याने त्याच्या शिक्षिकेसोबत शारीरिक संबंध ठेवले.  त्याचा व्हिडिओ बनवला आणि तोच व्हिडीओ त्या शिक्षिकेच्या पतीला पाठविण्याची धमकी देऊन त्या शिक्षिकेकडून आठ लाख रुपये उकळले. त्या विद्यार्थ्याचं नाव कृष्णकांत अखोरी असून तो 25 वर्षांचा आहे.

महिला शिक्षिका जेव्हा आपल्या पतीसोबत राहायला गेली, तेव्हा कृष्णकांत अखोरीने ते व्हिडीओ पतीला पाठवण्याची धमकी देऊन शिक्षकेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यावेळी शिक्षिकेने याला नकार दिला आणि तेव्हा कृष्णकांत ने ते व्हिडीओ शिक्षिकेच्या पतीला पाठवले, ज्यानंतर शिक्षिकेने आरे पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करत पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी कृष्णकांत आखोरीला दिल्लीच्या संगम विहारमधून अटक केली आणि त्याला कोर्टात हजर केले आहे. हे त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

आरे येथील रॉयल पाल्ममध्ये राहणाऱ्या शिक्षिकेने पोलिसांना सांगितलं की, 2016 मध्ये बिहारच्या पटना येथे ती जेव्हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लास घेत होती. त्यावेळेला कृष्णकांत अखोरी तिच्या क्लासमध्ये शिकत होता. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमामध्ये झालं. त्यामुळे दोघे एकमेकांच्या जवळ आले. दोघे वारंवार भेटू लागले आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध स्थापित झाले, ज्याचा व्हिडीओ कृष्णकांतने गपचूप बनवला आणि तो व्हिडीओ दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी तो करू लागला. ज्यासाठी शिक्षिकेने नकार दिला तेव्हा त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून आठ लाख रुपये उकळले. 

काही वर्षांनंतर शिक्षिका जेव्हा आपल्या पतीसोबत मुंबईमध्ये स्थलांतरित झाली आणि मुंबईमध्ये राहू लागली तेव्हा आरोपी कृष्णकांतने दिल्लीत बोलून शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. ज्याला शिक्षिकेने नकार दिला आणि त्यानंतर आरोपी कृष्णकांतने व्हिडीओ शिक्षिकेच्या पतीला पाठवले. 

महिला शिक्षिकेच्या पतीने या संदर्भात आरे पोलीस स्टेशनमध्ये कृष्णकांत अखोरीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कलम 385, 354 (अ) आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.

मोबाईल लोकेशनच्या आधारे कृष्णकांत अखोरी दिल्लीच्या संगम विहारमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आरे पोलीस स्टेशनच पथक दिल्लीला रवाना झालं आणि त्यांनी कृष्णकांत आखरीला अटक केली. पोलिसांनी कृष्णकांत अखोरीला कोर्टात हजर केलं. जिथे कोर्टाने त्याला 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram