Mumbai Crime : गुंड Deepak Sangle ची कुटुंब आणि चाळीतील रहिवाशांकडूनच हत्या ABP Majha
मुंबईतील कुर्ल्यातून एक धक्कादायक बातमी. कुर्ल्यातील एका गुन्हेगाराची त्याच्या कुटुंबीयांसह चाळीतल्या रहिवाशांनी मिळून हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. दीपक सांगळे असं हत्या झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. हत्येनंतर दीपक सांगळेचा मृतदेह घराच्या आवारात पुरण्यात आला होता. हा मृतदेह आज बाहेर काढण्यात येणार असल्याचं समजतंय. दीपक सांगळे हा १६ जूनपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्याच पत्नीने पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्यानंतर हत्येचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. दीपक सांगळेची कुर्ल्यातल्या विनोबा भावे परिसरातल्या चाळीत दहशत होती. चाळीतील रहिवाशांसह दीपकचे कुटुंबीयही त्याच्या त्रासाला वैतागले होते. अखेर चाळीतील रहिवाशांसोबत संगनमत करून कुटुंबियांनी त्याची हत्या केली. या प्रकरणात आतापर्यंत सातजणांना अटक करण्यात आली आहे.