मुंबई क्राईम ब्रांचचे पोलिस निरीक्षक सुनील माने यांना NIA कडून अटक, हिरण हत्येवेळी माने उपस्थित

सुनील माने मुंबईतील कांदिवली गुन्हे शाखा कक्ष  म्हणजे यूनिट नंबर 11 चे इन्चार्ज होते. मनसुख हिरण प्रकरणानंतर त्यांची बदल लोकल आर्म्स विभागात करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इन्स्पेक्टर सुनील माने 2, 3 आणि 4 मार्च मुंबई कमिशनर कार्यालय परिसरातील सीआईयू कार्यालयात गेले होते. ३ मार्चला सुनील माने देखील सीआयईयूमध्ये झालेल्या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीला मनसुख हिरण यांना देखील बोलवण्यात आले होते. एनआयएला दिलेल्या जबाबात सुनील मानेने सांगितले होते की, कमिशनर कार्यालयात ते आपल्या पर्सनल बंदूकीचा लायसन्स बनवण्यासाठी गेले होते. त्यांना दोन बंदूकीसाठी लायसन्स हवे होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola