Miraroad Crime : मृतदेहाचे तुकडे उकळून मिक्सरमध्ये केले बारीक, मीरा रोड परिसरात क्रूतेचा कळस

मिरारोड मध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लिव इन रिलेशनशिप मध्ये राहणा-या आपल्या पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची घटना उघडकीस आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतदेहाचे तुकडे करून आरोपी ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकायचा, ते उकळायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायच. हे तुकडे तो पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी तो त्याच्या बाईकचा वापर करायचा. गुन्ह्यासाठी वापरलेलं सगळं सामान आणि बाईक काल रात्री पोलिसांनी जप्त केली. मनोज साने असं या 56 वर्षांच्या आरोपीचं नाव आहे, तर सरस्वती वैद्य असं मृत महिलेचं नाव आहे. ती ३२ वर्षांची होती. मीरा भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदीप नावाची सोसायटी आहे. तिथला हा सगळा प्रकार आहे. पोलिसांनी सानेला अटक केली आहे. हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola