BEED Crime : जेलमधून लाखोंची हेराफेरी! उज्जैनच्या तुरुंगातून बीडच्या सायबर गुन्हेगाराचा प्रताप

बीड : जेलमध्ये चोरून कोणी दारू सिगारेट नेल्याची अनेक बातम्या आपण ऐकल्या आहेत.  मात्र चक्क जेलमध्ये राहून एक कैदी लाखो रुपयांची हेराफेरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  घटना जरी उज्जैन जेलमध्ये असली तरी हा कैदी मात्र बीडचा आहे.

अमर अग्रवाल असे उज्जैन कैद्याचे नाव आहे.  सायबर गुन्ह्यात तुरुंगात असणाऱ्या या अमरने तुरुंगात राहून वेबसाईट हॅक करून लाखो रुपयांची हेराफेरी केली आहे. विशेष म्हणजे स्वतः जेलर आणि पोलिस यांनी  अमरकडून हे काम करून घेतले आहे. स्वतः अमर अग्रवालने याचा एक व्हिडीओ करून तो व्हायरल केला. व्हायरल व्हिडीओमुळे  जेलमध्ये चालू असलेल्या या खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola